Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Recurring decimal’ in Marathi
‘Recurring decimal’ चा मराठी अर्थ
शब्द: Recurring decimal
उच्चार: रिकरिंग डेसिमल
अर्थ: आवर्ती दशांश अपूर्णांक
अधिक माहिती: ज्या अपूर्णांक संख्येमधे दशांशचिन्हाच्या उजवीकडे एक अंक अथवा काही अंकांचा समूह पुन्हा पुन्हा येतो, अशा अपूर्णांकाला Recurring decimal किंवा आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात. जर दशांश अपूर्णांकात दशांशचिन्हाच्या उजवीकडे एकच अंक पुन्हा पुन्हा येत असेल, तर त्या अंकावर टिंब मांडला जातो. जर दशांशचिन्हाच्या उजवीकडे ठराविक अंकांचा गट पुन्हा पुन्हा येत असेल, तर त्या गटावर आडवी रेघ देतात.