Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Radioactive isotopes’ in Marathi
‘Radioactive isotopes’ चा मराठी अर्थ
शब्द: Radioactive isotopes
उच्चार: रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप्स
अर्थ: किरणोत्सारी समस्थानिक
अधिक माहिती: एकाच मूलद्रव्याची समस्थानिके (समान अणुअंक मात्र भिन्न न्युट्रॉन संख्येमुळे भिन्न अणुवस्तुमानांक असलेले अणु) जी त्यांच्या अस्थिर केंद्रकातून किरणोत्सार उत्सर्जीत करतात. किरणोत्सारी समस्थानिके त्यांच्या केंद्रकातून अल्फा किरण, बीटा किरण, गॅमा किरण या प्रकारचे किरण उत्सर्जीत करतात. किरणोत्सारी समस्थानिकांची उदाहरणे म्हणजे, युरेनिअम -235, कार्बन – 14, कोबाल्ट – 60, सोडिअम -24, ट्रिटिअम (³H) इ.