Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Rabies’ in Marathi
‘Rabies’ चा मराठी अर्थ
शब्द: Rabies
उच्चार: रेबीज
अर्थ: रेबीज, जलसंत्रास, आजारी कुत्रा चावल्यानंतर होणारा रोग
अधिक माहिती: रेबीज हा विषाणुजन्य रोग आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असेही म्हणतात. रेबीज विषाणूचा संसर्ग झालेला कुत्रा, माकड, किंवा इतर प्राणी चावल्यानंतर त्यांच्या लाळेतून जखमेद्वारे शरीरात प्रवेश झाल्याने होतो. रेबीज विषाणू मज्जातंतूवाटे मेंदूत प्रवेश करतात. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसांत दिसू लागतात. या रोगात 2 ते 12 आठवडे अंगात ताप राहतो. रुग्ण अतिशयोक्ती करत वागतो व त्याला पाण्याची भीती वाटते. पाण्याला घाबरणे म्हणजेच जलद्वेष (Hydrophobia) हे या रोगाच महत्त्वाचे लक्षण आहे. रेबीज हा प्राणघातक रोग आहे. कुत्रा किंवा प्राणी चावल्यानंतर लगेच व ठराविक कालावधीने लस दिल्यास रेबीज होण्यापासून संरक्षण करता येते.