Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pulse Oximeter’ in Marathi
‘Pulse Oximeter’ चा मराठी अर्थ
शब्द: Pulse Oximeter
उच्चार: पल्स ऑक्सिमीटर
अर्थ: हृदयाच्या ठोक्यांचा दर, रक्तदाब आणि रक्तातील ऑक्सिजन चे प्रमाण मोजण्याचे साधन
अधिक माहिती: हे यंत्र साधारणतः बोटाच्या टोकावर किंवा कानाच्या पाळीवर चिमट्यासारख़े लावले जाते. यात लाल प्रकाशकिरण (red light rays) व अवरक्त किरणांचा (infrared rays) वापर केला जातो ऑक्सिजनयुक्त हिमोग्लोबीन हे जास्त अवरक्त किरण शोषून घेते व कमी प्रमाणात लाल प्रकाशकिरण शोषते, तर ऑक्सिजनविरहित हिमोग्लोबीन हे जास्त लाल प्रकाशकिरण शोषून घेते व कमी प्रमाणात अवरक्त किरण शोषते, या तत्वाचा वापर करून रक्तातील ऑक्सिजन चे प्रमाण मोजले जाते.