Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Puberty’ in Marathi
‘Puberty’ चा मराठी अर्थ
शब्द: Puberty
उच्चार: प्युबर्टी
अर्थ: पौगांडावस्था, यौवनावस्था, लैंगिक परिपक्वतेचा कालावधी
अधिक माहिती: Puberty किंवा पौगांडावस्थेमधे व्यक्तीची पुनरुत्पादक संस्था कार्यरत होते. मनुष्यामधे पौगांडावस्था 10 ते 14 वर्षे वयादरम्यान सुरु होते. या काळात मुलांच्या व मुलींच्या शरिरात अनेक बदल होतात जे त्यांच्या शरिराला लैंगिक प्रजननासाठी सक्षम बनवतात. मुलींमधे गर्भाशय कार्यरत होते व मासिक चक्राची सुरुवात होते, स्तनांचा आकार वाढतो, काखेमधे व जांघेत केस येतात. मुलांमधे वृषण शुक्राणू सह वीर्य बनवण्यास सक्षम होतात. वृषणातील लेडीग्ज पेशी या मोठ्या प्रमाणावर टेस्टोस्टेरॉन बनवू लागतात ज्यामुळे मुलांमधे पुरुषी बदल होतात जसे की उंची वाढणे, स्नायूंचा आकार वाढणे, आवाज बदलणे, काखेत, जननांगाजवळ, दाढी व छातीवर केस येणे इ.