Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Protozoa’ in Marathi
‘Protozoa’ चा मराठी अर्थ
शब्द: Protozoa
उच्चार: प्रोटोझोआ
अर्थ: आदिजीव
अधिक माहिती: आदिजीव हे एकपेशीय दृश्यकेंद्रकी सजीव आहेत. यांच्या पेशीरचना, हालचालींचे अवयव, पोषणपद्धती यांत विविधता आढळते. स्वतंत्र जगणारे आदिजीव हे माती, गोडे पाणी व समुद्रात अाढळतात. पेशीरचनेच्या संदर्भात यांचे प्राणीपेशींशी साधर्म्य असते. परजीवी आदिजीव हे काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोकारक असतात. आदिजीविंचे प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते. आदिजीवींची उदाहरणे. अमिबा, पॅरामेशिअम, एन्टामिबा, प्लाज्मोडिअम, युग्लीना इ.