Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Proton’ in Marathi
‘Proton’ चा मराठी अर्थ
शब्द: Proton
उच्चार: प्रोटॉन
अर्थ: प्रोटॉन, अणुकेंद्रकातील धनप्रभारित अवअणुकण
अधिक माहिती: प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा अवअणुकण आहे. प्रॉट्न वर धनप्रभार असतो. केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉन वरील धनप्रभारामुळे असतो. प्रोटॉन ‘p’ ह्या संज्ञेने दर्शविले जातात. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या ही त्या मूलद्रव्याचा अणूअंकाइतकी असते व ती ‘Z’ ह्या संज्ञेने दर्शवतात.