Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Protista (Kingdom)’ in Marathi
‘Protista (Kingdom)’ चा मराठी अर्थ
शब्द: Protista (Kingdom)
उच्चार: प्रोटिस्टा किंगडम
अर्थ: एकपेशीय दृश्यकेंद्री सजीवसृष्टी
अधिक माहिती: एकपेशीय दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश प्रोटिस्टा सृष्टीत केला जातो. दृश्यकेंद्रकी पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. प्रोटिस्टा मधे प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. स्वयंपोषी प्रोटिस्टा पेशीत हरितलवके असतात उदाहरणे- युग्लिना, व्हॉल्व्हॉक्स इ. परपोषी प्रोटिस्टा ची उदाहरणे- अमिबा, पॅरामेशिअम, प्लास्मोडिअम, इत्यादी.