Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Prothrombin’ in Marathi
‘Prothrombin’ चा मराठी अर्थ
शब्द: Prothrombin
उच्चार: प्रोथ्रॉम्बीन
अर्थ: थ्रॉम्बीन बनणारे प्रथिन, रक्ताची गुठळी बनन्यासाठी आवश्यक असे रक्तातील एक प्रथिन
अधिक माहिती: जखम झाल्यामुळे किंवा इतर कारणांनी रक्तस्राव होत असल्यास रक्तस्राव थांबण्यासाठी त्या ठिकाणी रक्ताची गाठ बनणे आवश्यक असते. अशा वेळी रक्तातील Clotting factors (उदा. फिब्रिनिजेन, प्रोथ्रॉम्बीन) ही प्रथिनं कार्यरत होतात व रक्त साकळण्यास मदत करतात. प्रोथ्रॉम्बीन ला फॅक्टर टू असे म्हणतात. जखम झाल्यास त्या जागी कार्यरत प्रोथ्रोम्बीनेज (Factor Xa) हे प्रोथ्रॉम्बीन ला तोडून त्याचे थ्रॉम्बीन मधे रूपांतर करते. नंतर थ्रॉम्बीन हे फिब्रिनोजेन चे रूपांतर फिब्रिन मधे करते व त्यानंतर फिब्रिन एकमेकांना चिकटून त्याची इतर घटकांसह गुठळी बनते.