Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Polyomino’ in Marathi
‘Polyomino’ चा मराठी अर्थ
शब्द: Polyomino
उच्चार: पॉलिओमिनो
अर्थ: बहुचौरसाकृती, बहुचौरसपट, अनेक चौरसांची मांडणी
अधिक माहिती: Polyomino म्हणजे बहुचौरसाकृती ही अशाप्रकारची आकृती आहे की ज्यात समान आकाराचे अनेक चौरस (स्वेअर) त्यांच्या कडा जूळवून मांडलेले असतात. (ज्याप्रमाणे टाइल्स मांडलेल्या असतात). विविध प्रकारे या चौरसांची मांडणी करता येते. अशा प्रकारच्या आकृतींना Polyomino आकृती असे म्हणतात. Monomino – एक चौरस, Domino – दोन चौरसांची मांडणी, Tromino – तीन चौरसांची मांडणी, Tetromino – चार चौरसांची मांडणी, Pentomino – पाच चौरसांची मांडणी, Hexomino – सहा चौरसांची मांडणी इ.