Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pollen tube’ in Marathi
‘Pollen tube’ चा मराठी अर्थ
शब्द: Pollen tube
उच्चार: पोलन ट्युब
अर्थ: परागनलिका
अधिक माहिती: परागीभवनानंतर कुक्षी (स्टिग्मा) वर परागकण (पोलन ग्रेन) पडल्यावर ते अंकुरित होतात आणि एक लांब Pollen tube किंवा परागनलिका तयार होते. ही परागनलिका कुक्षिवृंतातून (स्टाइल) बीजांडातील (ओव्ह्युल) भ्रूणकोषात (एम्ब्रिओ सॅक) मधे पोहोचते. परागनलिकेतून परागकणातील दोन पुंयुग्मक (मेल गॅमेट्स) भृणकोषापर्यंत वाहून नेले जातात.