Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Period of secretions of glands in endometrium’ in Marathi
‘Period of secretions of glands in endometrium’ चा मराठी अर्थ
शब्द: Period of secretions of glands in endometrium
उच्चार: पिरिअड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लॅंड्स इन एन्डोमेट्रिअम
अर्थ: गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवण्याचा काळ
अधिक माहिती: ओव्ह्युलेशन (अंडमोचन) नंतर अंडाशयामध्ये राहिलेल्या फुटलेल्या पुटिकेपासून पितपिंड (Corpus luteum) तयार होते. हे पितपिंड ‘प्रोजेस्टेरॉन संप्रेरक’ स्त्रवण्यास सुरुवात करते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील (एन्डोमेट्रिअमच्या) ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात होते. ही स्थिती मासिक ऋतुचक्राच्या 16 ते 28 दिवसांपर्यंत असते. एन्डोमेट्रिअमची ही स्थिती गर्भाच्या रोपणासाठी (इम्प्लॅंटेशन) आवश्यक असते.