Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Peer reviewed journal’ in Marathi
‘Peer reviewed journal’ चा मराठी अर्थ
शब्द: Peer reviewed journal
उच्चार: पीअर रिव्ह्यु
अर्थ: सहकार्यांकडून तपासणी म्हणजे त्याच क्षेत्रातील जाणकारांकडून गुणवत्तेची पडताळणी केल्यानंतरच संशोधन लेख प्रसिद्ध करणारी विज्ञानपत्रिका
अधिक माहिती: विज्ञान पत्रिकांमधे शोधपत्रिका व लेख प्रसिद्ध करण्यापुर्वी ते लेख त्यांची अचुकता व विश्वसनियता वैज्ञानिक कसोट्यांवर पडताळण्यासाठी त्या क्षेत्रातील इतर नामवंत शास्त्रज्ञांकडे पाठवली जातात. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संशोधन लेख सादर करणाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळावी लागतात. या प्रक्रियेनंतर जाणकारांकडून संशोधनाच्या गुणवत्तेबाबत सकारत्मक अहवाल मिळाल्यानंतरच ते शोध विज्ञानपत्रिकेमधे प्रसिद्ध केले जातात. अशा प्रकारे कठिण निकष पार केल्यानंतरच संशोधन लेख प्रसिद्ध करणाऱ्या विज्ञानपत्रिकांना Peer reviewed journal असे म्हणतात.