Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ovulation period’ in Marathi
‘Ovulation period’ चा मराठी अर्थ
शब्द: Ovulation period
उच्चार: ओव्ह्युलेशन पिरिअड
अर्थ: अंडमोचनाचा काळ
अधिक माहिती: ओव्हरी (अंडाशय) मधे असलेल्या असंख्य फॉलिकल (पुटीका) पैकी एका पुटीकेचा व त्यातील ऊसाइट (अंडपेशी/ डिंबपेशी) चा ‘पुटीका ग्रंथी संप्रेरक’ (Follicle stimulating hormone) च्या प्रभावामुळे विकास होण्यास सुरूवात होते. ही विकसनशील पुटिका ‘इस्ट्रोजेन’ हे संप्रेरक स्त्रवते. ओव्हरी (अंडाशय) मधे वाढणाऱ्या फॉलिकल (पुटिका) ची वाढ पूर्ण झाल्यानंतर ‘पितपिंडकारी संप्रेरक’ (Luteinizing hormone) च्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका (फॉलिकल) फुटते व त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. याला ओव्ह्युलेशन (अंडमोचन) असे म्हणतात. हे ऋतुचक्राच्या 14 ते 15 व्या दिवशी घडते.