Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Oviduct’ in Marathi
‘Oviduct’ चा मराठी अर्थ
शब्द: Oviduct
उच्चार: ओव्हीडक्ट
अर्थ: अंडनलिका
अधिक माहिती: Oviduct किंवा अंडनलिका या ओव्हरी मधून बाहेर पडणार्या अंडपेशी ला गर्भाशयापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्ग म्हणून कार्य करतात. स्त्री-प्रजनन संस्थेत दोन ओव्हीडक्ट असतात. अंडनलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासरखा असतो ज्यावर बोटांसारखे बाहेर आलेले फिंब्री असतात. फिंब्री अंडपेशींना अंडनलिकेच्या छिद्रातून अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यास मदत करतात. अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर सिलिआ (रोमक) असतात जे अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात.