Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Osmotic pressure’ in Marathi
‘Osmotic pressure’ चा मराठी अर्थ
शब्द: Osmotic pressure
उच्चार: ऑस्मॉटिक प्रेशर
अर्थ: परासरणीय दाब
अधिक माहिती: पाण्याची (द्रावक) जास्त संहिता (कॉन्सन्ट्रेशन) असलेल्या भागाकडून पाण्याची कमी संहिता असलेल्या भागाकडे अर्ध पारपटलातून (सेमिपरमिएबल मेंब्रेन) होणारे पाण्याचे वहन म्हणजे Osmosis किंवा परासरण होय. उदाहरण म्हणजे अर्ध पारपटलाच्या भिंतीने वेगळे केलेल्या दोन भागांमधील एका भागात जास्त खारट पाणी (जास्त मीठ विरघळलेले) व अर्ध पारपटलाच्या पलिकडच्या दुसर्या भागात कमी मीठ विरघळलेले तेवढेच पाणी ठेवल्यास हळूहळू कमी मीठ विरघळलेल्या कप्प्यातून पाणी अर्ध पारपटलामधून जास्त मीठ विरघळलेल्या भागाकडे जाऊ लागते. या प्रक्रियेत पाण्याच्या वहनामुळे जास्त मीठ विरघळलेल्या भागामधे दाब निर्माण होतो. परासरणामुळे निर्माण झालेल्या दाबाला Osmotic pressure किंवा परासरणीय दाब असे म्हणतात.