Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Nuclear reaction’ in Marathi
‘Nuclear reaction’ चा मराठी अर्थ
शब्द: Nuclear reaction
उच्चार: न्युक्लिअर रिॲक्शन
अर्थ: केंद्रकीय अभिक्रिया
अधिक माहिती: दोन अणुकेंद्रक किंवा एक अणुकेंद्रक व बाह्य अवअणुकण (अल्फा कण, न्युट्रॉन इ.) एकमेकांवर आदळल्याने एक किंवा अधिक नवीन अणुकेंद्रक तयार होण्याच्या क्रियेला Nuclear reaction किंवा केंद्रकीय अभिक्रिया असे म्हणतात. उदा. युरेनिअम-235 ह्या अणुइंधनाच्या अणुकेंद्रकांवर मंद गतीच्या न्यूट्रॉनांचा मारा केला असता युरेनिअम-235 च्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रिप्टॉन-92 व बेरिअम-141 ह्या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात व प्रचंड प्रमाणात उर्जा उत्सर्जीत होते.