Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Nuclear fuel’ in Marathi
‘Nuclear fuel’ चा मराठी अर्थ
शब्द: Nuclear fuel
उच्चार: न्युक्लिअर फ्युएल
अर्थ: केंद्रकीय इंधन, अणुइंधन
अधिक माहिती: उदा. युरेनिअम-235, प्लुटोनिअम-239 इ. उर्जा मिळवण्यासाठी अस्थिर केंद्रक असलेल्या किरणोत्सारी जड मूलद्रव्यांचे अणु हे इंधन म्हणून वापरले जाते. केंद्रकीय इंधनाचे अणुभट्टीमधे नियंत्रित केंद्रकीय विखंडन घडवून आणले जाते. केंद्रकीय विखंडन ही अशी प्रक्रिया आहे ज्यात अणुच्या केंद्रकाचे दोन किंवा जास्त लहान केंद्रकामधे विभाजन केले जाते. जड मूलद्रव्ये (उदा. युरेनिअम-235, प्लुटोनिअम-239 इ.) चे केद्रकीय विखंडन केल्यास प्रचंड प्रमाणात उर्जा उत्सर्जीत होते ज्याला केंद्रकिय उर्जा असे म्हणतात. अणुभट्ट्यांमधे या उर्जेचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो.