Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Nuclear fission’ in Marathi
‘Nuclear fission’ चा मराठी अर्थ
शब्द: Nuclear fission
उच्चार: न्युक्लिअर फिशन
अर्थ: केंद्रकीय विखंडन, अणुच्या केंद्रकाचे तुकडे करणे
अधिक माहिती: केंद्रकीय विखंडन ही अशी प्रक्रिया आहे ज्यात अणुच्या केंद्रकाचे दोन किंवा जास्त लहान केंद्रकामधे विभाजन केले जाते. जड मूलद्रव्ये (उदा. युरेनिअम-235, प्लुटोनिअम-239 इ.) चे केद्रकिय विखंडन केल्यास प्रचंड प्रमाणात उर्जा उत्सर्जीत होते ज्याला केंद्रकिय उर्जा असे म्हणतात. अणुभट्ट्यांमधे या उर्जेचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो.