Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Nickel-Cadmium (Ni-Cd) cell’ in Marathi
‘Nickel-Cadmium (Ni-Cd) cell’ चा मराठी अर्थ
शब्द: Nickel-Cadmium (Ni-Cd) cell
उच्चार: निकेल-कॅडमिअम सेल
अर्थ: निकेल-कॅडमिअम विद्युतघट
अधिक माहिती: यात निकेल (III) ऑक्साइड-हायड्रॉक्साइड हा धन (+) विद्युत अग्र, कॅडमिअम धातूचा ऋण (-) विद्युत अग्र व पोटॅशिअम हायड्रॉक्साइड या विद्युत अपघटनी (electrolyte) चा वापर केला जातो. निकेल-कॅडमिअम विद्युतघटांचा वापर कुठेही नेऊन वापरता येण्यासारख्या उपकरणांमधे केला जातो. हे विद्युतघट पुनःविद्युतप्रभारीत करता येतात. या विद्युतघटांमधे वापरले जाणारे पोटॅशिअम हायड्रॉक्साइड हे अत्यंत क्रियाशील रसायन क्षतिकारक असते, त्याची गळती झाल्यास त्वचा भाजली जाऊ शकते.