Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Neutron number’ in Marathi
‘Neutron number’ चा मराठी अर्थ
शब्द: Neutron number
उच्चार: न्युट्रॉन नंबर
अर्थ: न्यूट्रॉन संख्या, मूलद्रव्याच्या अणुच्या केंद्रकातील न्यूट्रॉनची संख्या
अधिक माहिती: अणुच्या केंद्रकातील न्यूट्रॉन हा विद्युतप्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अवअणुकण असून त्याचा निर्देश ‘n’ ह्या संज्ञेने करतात. केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी ‘n’ ही संज्ञा वापरतात. (न्यूट्रॉन संख्या n = A – Z) 1 u इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन असतात. एकाच मूलद्रव्याच्या विविध समस्थानिकांमधे अणुअंक म्हणजे प्रोटॉन संख्या समान असते मात्र न्युट्रॉन संख्या वेगवेगळी असते आणि त्यामुळेच समस्थानिकांचा अणुवस्तुमानांक वेगवेगळा असतो.