Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Multiple fission’ in Marathi
‘Multiple fission’ चा मराठी अर्थ
शब्द: Multiple fission
उच्चार: मल्टिपल फिशन
अर्थ: बहुविभाजन, बहुविखंडन
अधिक माहिती: एकाच पेशीमधे अनेक विभाजन होऊन अनेक पेशी तयार होण्याची प्रक्रिया. Multiple fission किंवा बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन एकपेशीय आदिजीव (उदा. अमिबा) मधे प्रतिकूल वातावरणामध्ये होते. प्रतिकूल परिस्थिती मधे एकपेशीय आदिजीव (प्रोटिस्ट) पेशीपटलाभोवती कठीण, संरक्षक कवच तयार करतो ज्याला सिस्ट (पुटी) असे म्हणतात. पुटीतील आदिजीव पेशीमधे फक्त पेशीकेंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन (मायटॉसिस) होते व अनेक पेशीकेंद्रके तयार होतात. अनेक केंद्रके असलेल्या पेशीतील पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे-छोटे प्रोटिस्ट (आदिजीव) तयार होतात. प्रतिकूल परिस्थि ती असेपर्यंत या लहान आदिजीव पेशी सिस्टमध्येच राहतात. अनुकूल परिस्थिती आल्यानंतर सिस्ट फुटते आणि त्यातून अनेक लहान आदिजीव बाहेर पडतात व सामान्यपणे वाढतात.