Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Male reproductive system’ in Marathi
‘Male reproductive system’ चा मराठी अर्थ
शब्द: Male reproductive system
उच्चार: मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टिम
अर्थ: नर पुनरुत्पादक संस्था
अधिक माहिती: मनुष्यातील नर पुनरुत्पादक संस्थेमधे सेमिनल व्हेसिकल (शुक्राशय), प्रोस्टेट ग्लॅंड (पुःरस्थ ग्रंथी), वास डेफरंस (शुक्रवाहिनी), कूपर्स ग्लॅंड (काऊपरग्रंथी), युरिनो जेनिटल डक्ट (मूत्र जनन वाहिनी), इपिडिडिमिस (अधिवृषण), स्क्रॉटम (वृषणकोष), इजॅक्युलेटरी डक्ट्स (स्खलन वाहिनी), टेस्टिस (वृषण) आणि पेनिस (शिश्न) यांचा समावेश होतो. नर पुनरुत्पादक संस्थेचे कार्य नरबीज /स्पर्म (शुक्रजंतू) तयार करणे व ते मादा पुनरुत्पादक संस्थेत पोहोचवणे हे असते.