Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Lightning conductor’ in Marathi
‘Lightning conductor’ चा मराठी अर्थ
शब्द: Lightning conductor
उच्चार: लायटनिंग कंडक्टर
अर्थ: तडितरक्षक, विद्युत वाहक
अधिक माहिती: ढगातून पडणाऱ्या विजेच्या अाघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात, त्याला lightening conductor किंवा तडितरक्षक असे म्हणतात. ही एक तांब्याची लांब तार किवा पट्टी असते जीचे एक टोक इमारतीच्या सर्वात वरच्या टोकावर असते व दुसरे टोक जमिनीखाली मोठ्या लोखंडी वस्तूला जोडलेले असते. इमारतीवर वीज पडल्यास वीज सरळ तांब्याच्या तारेतून जमिनीकडे वाहली जाते व इमारतीचे व इमारतीत राहणार्या लोकांचे नुकसान होण्यापासून रक्षण होते.