Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Light Detection And Ranging (LiDAR)’ in Marathi
‘Light Detection And Ranging (LiDAR)’ चा मराठी अर्थ
शब्द: Light Detection And Ranging (LiDAR)
उच्चार: लाइट डिटेक्शन ॲंड रेंजिंग
अर्थ: ले्झर प्रकाशाचा वापर करून भूभागाचा नकाशा बनवण्याचे तंत्रज्ञान
अधिक माहिती: LiDAR हे ले्झर प्रकाशाचा वापर करून भूभागाचा नकाशा बनवण्याचे तंत्रज्ञान आहे. या तंत्रामधे आकाशातील उपकरणाद्वारे (विमान /उपग्रह) जमीनीवर लेझर प्रकाशाचे अत्यंत कमी वेळेचे प्रकाशझोत वारंवार (पल्स्ड लेझर) सोडले जातात. प्रकाशाचे जमिनीवरून परावर्तन होऊन उपकरणाकडे परत पोहोचण्यासाठी लागलेला वेळ मोजला जातो व त्यावरून जमीन व आकाशातील उपकरणादरम्यानचे अचूक अंतर मोजले जाते. या अंतरांचा वापर करून जमीनीचा/ भूभागांचा त्रिमितीय (3D) नकाशा बनवला जातो.