Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Left atrium’ in Marathi
‘Left atrium’ चा मराठी अर्थ
शब्द: Left atrium
उच्चार: लेफ्ट ॲट्रिअम
अर्थ: डावे अलिंद
अधिक माहिती: हृदयाच्या चार कप्प्यांपैकी डाव्या भागातील वरच्या कप्प्याला डावे अलिंद (लेफ्ट ॲट्रिअम) असे म्हणतात. डाव्या अलिंदामधे फुफ्फुसांकडून ऑक्सिजनयुक्त ताजे रक्त चार पल्मोनरी व्हेन (फुफ्फुसांकडून येणार्या शीरा, दोन डाव्या व दोन उजव्या) द्वारे येते. ते रक्त डाव्या अलिंद (लेफ्ट ॲट्रिअम) मधे जमा होते. डावे अलिंद (लेफ्ट ॲट्रिअम) आकुंचन पावल्यावर द्विदली झडपेतून (बायकस्पीड व्हाल्व्ह) रक्त डाव्या निलयामधे (लेफ्ट व्हेंट्रिकल) मधे उतरते.