ॲप डाउनलोड करा

Download Sciencekosh App

अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)

बॅच जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा.

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्याची 75 वर्षे 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

Marathi Science Dictionary

Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
Search in posts
Search in pages

मराठी विज्ञान शब्दकोश

Meaning of ‘Krebs cycle’ in Marathi

‘Krebs cycle’ चा मराठी अर्थ

शब्द: Krebs cycle

उच्चार: क्रेब्ज सायकल

अर्थ: पेशीश्वसनातील जैवरासायनिक प्रक्रियांच्या चक्राचे नाव

अधिक माहिती: सजीवांच्या जीवनप्रक्रिया चालू राहण्यासाठी अन्न (पोषकतत्वे व शर्करा) व ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. पेशींमधे शर्करेचे ऑक्सिडेशन घडवून ऊर्जानिर्मिती होण्यासाठी शर्करा व ऑक्सिजनचा सतत पुरवठा व्हावा लागतो. पेशींतील ग्लूकोज या शर्करेचे ऑक्सिजन वापरून अनेक चक्राकार टप्प्यांच्या क्रमवार जैवरासायनिक अभिक्रियांमार्फत ऑक्सिडेशन होऊन ATP च्या स्वरूपात ऊर्जा मिळवली जाते. प्रत्येक टप्प्यावर एक विशिष्ट विकर (एंज़ाइम) कार्य करते. या प्रक्रियेत CO₂ हे निरुपयोगी पदार्थ व पाण्याचे रेणू तयार होतात. या प्रक्रियेला Cellular respiration किंवा पेशीश्वसन असे म्हणतात. या क्रियेत प्रथम ग्लुकोजचे (सहा कार्बन असणारे संयुग) रूपांतर ग्लायकॉलिसिस प्रक्रियेद्वारे पायरुव्हेट (दोन कार्बन असणारे संयुग) व नंतर ॲसिटिल कोए मधे केले जाते. त्यानंतर जैवरासायनिक चक्रात निर्माण होणारे पहिले रसायन म्हणजे सिट्रिक ॲसिड हे एक ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड प्रकारचे रसायन आहे यावरून या चक्राचे नाव पडले आहे. अभिक्रियांच्या या चक्राला सिट्रिक ॲसिड सायकल, टीसीए सायकल (ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल), क्रेब्ज सायकल अशा विविध नावांनी ओळखले जाते. या चक्राकार अभिक्रिया अंतिम संक्षिप्त रूपात पुढील समीकरणाच्या रूपाने मांडल्या जातात. C₆H₁₂O6 + 6O₂ —- 6CO₂ + 6H₂O+ ऊर्जा (38ATP)

तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा

टेलीग्राम चॅनेलसाठी इथे किंवा चॅनेलचे नाव किंवा चॅनेल आयकॉन वर क्लिक करा

Poll about which class currently studying
11th Admission CET Test Series Sciencet Series Science
अकरावी / बारावी MHT-CET (Biology) चा अभ्यास मराठीतून
ॲप डाउनलोड करा
Download Sciencekosh App
वाचा माहितीपूर्ण विज्ञान लेख …
perseverance and ingenuity on marse surface
Sciencekosh banner
error: