Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Isotonic solution’ in Marathi
‘Isotonic solution’ चा मराठी अर्थ
शब्द: Isotonic solution
उच्चार: आयसोटोनिक सोल्युशन
अर्थ: समपरासरी द्रावण
अधिक माहिती: द्रावणात असलेली अर्धपारपटलाचे आवरण असलेली पेशी विचारात घ्या. जर या द्रावणात मीठासारख्या क्षारांची संहिता (कॉन्संट्रेशन) ही पेशीच्या आत असलेल्या द्रावणातील क्षारांच्या संहितेपेएवढीच असेल म्हणजेच अशा स्थितीत पेशीच्या बाहेरच्या पाण्याची संहिता पेशीच्या आतील पाण्याच्या संहितेएवढीच आहे. अर्धपारपटलाच्या दोन्ही बाजूंना पाण्याची संहिता समान आहे त्यामुळे अर्धपारपटलामधून सरासरी पाण्याचे वहन कुठल्याही बाजूला होणार नाही. परिणामी पेशीच्या आत असलेल्या पाण्याचे प्रमाण स्थिर राहील त्यामुळे पेशीच्या आकारात काहीही बदल होणार नाही. असे द्रावण ज्याच्यामधे पाण्याची (द्रावकाची) संहिता, ही त्या द्रावणात असलेल्या पेशीच्या आतील पाण्याच्या संहितेएवढीच आहे, अशा द्रावणाला Isotonic solution किंवा समपरासरी द्रावण असे म्हणतात.