Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘ion’ in Marathi
‘ion’ चा मराठी अर्थ
शब्द: ion
उच्चार: आयन
अर्थ: आयन, मूलद्रव्यांच्या अणूंची बाहेरच्या कक्षेमधे इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकातील प्रोटॉनपेक्षा जास्त किवा कमी असण्याची स्थिती
अधिक माहिती: मूलद्रव्यांच्या अणूंच्या बाहेरच्या कक्षेमधे इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकातील प्रोटॉनपेक्षा जास्त असल्यास अणूवर ऋण प्रभार असतो व त्याला ऋण (-) आयन असे म्हणतात. मूलद्रव्यांच्या अणूंच्या बाहेरच्या कक्षेमधे इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकातील प्रोटॉनपेक्षा कमी असल्यास त्या अणूवर धन प्रभार असतो व त्याला धन (+) आयन असे म्हणतात. उदा. धन आयन Na⁺, Mg²⁺ इ. ऋण आयन Clˉ, O²ˉ इ.