Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Intergeneric hybrid’ in Marathi
‘Intergeneric hybrid’ चा मराठी अर्थ
शब्द: Intergeneric hybrid
उच्चार: इंटरजेनेरिक हायब्रीड
अर्थ: आंतरप्रजातीय संकरित, दोन वेगवेगळ्या जीनस दरम्यान संकर घडवून जन्माला आलेला
अधिक माहिती: आपापसात प्रजनन करू शकणाऱ्या वेगवेगळ्या प्रजाती (जीनस) दरम्यान प्रजनन घडल्यास किंवा जाणूनबूजून घडवून आणल्यास Intergeneric hybrid तयार होतात. असे सजीव लैंगिक प्रजन करण्यास अक्षम असतात. उदा. रॅफॅनोब्रासिका (Raphanobrassica किंवा Brassicoraphanus) ही वनस्पती Brassica (फुलगोबी) व Raphanus (मुळा) या दोन प्रजाती (जीनस) दरम्यान घडवून आणलेली आंतरप्रजातीय संकरीत वनस्पती आहे.