Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Hypotonic solution’ in Marathi
‘Hypotonic solution’ चा मराठी अर्थ
शब्द: Hypotonic solution
उच्चार: हायपोटोनिक सोल्युशन
अर्थ: अवपरासरी द्रावण
अधिक माहिती: द्रावणात असलेली अर्धपारपटलाचे आवरण असलेली पेशी विचारात घ्या. जर या द्रावणात मीठासारख्या क्षारांची संहिता (कॉन्संट्रेशन) ही पेशीच्या आत असलेल्या द्रावणातील क्षारांच्या संहितेपेक्षा कमी असेल म्हणजेच अशा स्थितीत पेशीच्या बाहेरच्या पाण्याची संहिता पेशीच्या आतील पाण्याच्या संहितेपेक्षा जास्त आहे. अर्धपारपटलाच्या दोन्ही बाजूंना पाण्याची संहिता समान होण्यासाठी पेशीच्या बाहेरील जास्तीचे पाणी अर्धपारपटलामधून पेशीच्या आत येईल व अर्धपारपटलाच्या दोन्ही बाजूला पाण्याची संहिता समान होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. परिणामी पेशीच्या आत पाण्याचे प्रमाण वाढू लागेल त्यामुळे पेशी फुगेल. असे द्रावण ज्याच्यामधे पाण्याची (द्रावकाची) संहिता, ही त्या द्रावणात असलेल्या पेशीच्या आतील पाण्याच्या संहितेपेक्षा जास्त आहे, अशा द्रावणाला Hypotonic solution किंवा अवपरासरी द्रावण असे म्हणतात.