Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Hypertonic solution’ in Marathi
‘Hypertonic solution’ चा मराठी अर्थ
शब्द: Hypertonic solution
उच्चार: हायपरटोनिक सोल्युशन
अर्थ: अतिपरासरी द्रावण
अधिक माहिती: द्रावणात असलेली अर्धपारपटलाचे आवरण असलेली पेशी विचारात घ्या. जर या द्रावणात मीठासारख्या क्षारांची संहिता (कॉन्संट्रेशन) ही पेशीच्या आत असलेल्या द्रावणातील क्षारांच्या संहितेपेक्षा जास्त असेल म्हणजेच अशा स्थितीत पेशीच्या बाहेरच्या पाण्याची संहिता पेशीच्या आतील पाण्याच्या संहितेपेक्षा कमी आहे. अर्धपारपटलाच्या दोन्ही बाजूंना पाण्याची संहिता समान होण्यासाठी पेशीच्या आतील जास्तीचे पाणी अर्धपारपटलामधून बाहेर येइल व अर्धपारपटलाच्या दोन्ही बाजूला पाण्याची संहिता समान होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. असे द्रावण ज्याच्यामधे पाण्याची (द्रावकाची) संहिता, ही त्या द्रावणात असलेल्या पेशीच्या आतील पाण्याच्या संहितेपेक्षा कमी आहे, अशा द्रावणाला Hypertonic solution किंवा अतिपरासरी द्रावण असे म्हणतात.