Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Human Blood Groups’ in Marathi
‘Human Blood Groups’ चा मराठी अर्थ
शब्द: Human Blood Groups
उच्चार: ह्युमन ब्लड ग्रुप्स
अर्थ: मानवी रक्तगट
अधिक माहिती: व्यक्तीच्या रक्तातील लाल रक्तपेशींच्या बाहेरील पृष्ठभागावर असलेल्या प्रतिजनाच्या (ॲटिजन) प्रकारानुसार व्यक्तीचा रक्तगट ठरतो. लाल रक्तपेशींवर A आणि B प्रतिजनाची उपस्थिती किंवा अनुपस्थितीवर आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत. मानवी रक्ताचे A, B, AB आणि O असे चार प्रमुख गट आहेत. यातही ‘आर एच फॅक्टर’या प्रतिजनाच्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीवर आधारित ‘आर एच’पॉझिटिव्ह व ‘आर एच’ निगेटिव्ह असे प्रकार असतात. A, B, AB आणि O असे चार प्रमुख गट व Rh factor ची उपस्थिती किंवा अनुपस्थिती यानुसार आठ प्रकारचे रक्तगट असतात. A Rh +ve, A Rh -ve, B Rh +ve, B Rh -ve, AB Rh +ve AB Rh -ve, O Rh +ve आणि O Rh -ve. रक्तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या जनुकांवर अवलंबून असतात.