Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Homeopathy’ in Marathi
‘Homeopathy’ चा मराठी अर्थ
शब्द: Homeopathy
उच्चार: होमिओपॅथी
अर्थ: शरीर स्वतःच रोग बरे करू शकते असा विश्वास असणारी उपचारपद्धती
अधिक माहिती: सॅम्युएल हॅनेमन या जर्मन वैद्यकाने इ.स. 1796 मधे या उपचारपद्धतीची संकल्पना मांडली होती. ही उपचारपद्धती या विश्वासावर आधारित आहे की शरीर स्वतःच रोग बरे करू शकते. या उपचारपद्धतीत नैसर्गिक पदार्थ, वनस्पती व खनिज पदार्थांचा अतिशय कमी प्रमाणात वापर केला जातो. हे पदार्थ बरे होण्याच्या प्रक्रियेला सहाय्य करतात असा विश्वास ठेवला जातो.