Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Heavy water’ in Marathi
‘Heavy water’ चा मराठी अर्थ
शब्द: Heavy water
उच्चार: हेवी वॉटर
अर्थ: जड पाणी, D₂O
अधिक माहिती: जड पाण्यामधे हायड्रोजनएवजी हायड्रोजनचे समस्थानिक ड्युटेरिअम (²H) असते. ड्यूटेरिअमचे वस्तूमान हायड्रोजनपेक्षा जास्त असल्याने या पाण्याचे वस्तूमान जास्त असते. (हायडोजन (¹₁H) च्या केंद्रकात फक्त एक प्रोटॉन असतो मात्र त्याचा समस्थानिक ड्युटेरिअम (²H) च्या केंद्रकामधे एक प्रोटॉन व एक न्युट्रॉन असतो. त्यामुळे ड्युटेरिअम चा अणुवस्तुमानांक दोन असतो.) जड पाण्याचा वापर अणुभट्ट्यांमधे निर्माण होणारे न्युट्रॉन शोषून घेण्याकरिता होतो.