Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Heart beat rate’ in Marathi
‘Heart beat rate’ चा मराठी अर्थ
शब्द: Heart beat rate
उच्चार: हार्ट बीट रेट
अर्थ: हृदयगती, हृदयाच्या ठोक्यांची गती/दर
अधिक माहिती: दर मिनिटाला पडणार्या हृदयाच्या ठोक्यांना Pulse rate किंवा हृदयगती असे म्हणतात. सामन्यपणे निरोगी प्रोढ मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास 60 ते 100 ठोके पडतात. हृदयाच्या ठोक्यांची गती शारिरीक श्रम किंम्वा व्यायाम केल्याने वाढते कारण त्यावेळी शरीराची ऑक्सिजन/उर्जेची गरज वाढलेली असते. मानसिक स्थितीचाही हृदयाच्या ठोक्यांच्या गतीवर परिणाम होतो. भीती किवा मानसिक तनावामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात. मनुष्य झोपला असताना किंवा आराम करत असताना हृदयाच्या ठोक्यांची गती कमी होते. लहान बाळांच्या हृदयाच्या ठोके जास्त गतीने पडतात.