Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Heart’ in Marathi
‘Heart’ चा मराठी अर्थ
शब्द: Heart
उच्चार: हार्ट
अर्थ: हृदय
अधिक माहिती: हृदय हे रक्ताभिसरण संस्थेतील मध्यवर्ती अवयव आहे. हृदय हे पुन्हा पुन्हा आकुंचन पावून रक्तवाहिन्यांमधे रक्त जोराने ढकलते ज्यामुळे रक्तवाहिन्या व केशिकांमधून रक्त संपूर्ण शरीरभर फिरत राहते. मानवी हृदय हा अनैच्छिक स्नायूने बनलेला, मांसल अवयव आहे. मानवी हृदयाचा आकार आपल्या मुठीएवढा असतो व वजन साधारणपणे 360 ग्रॅम असते. मानवी हृदय छातीच्या पिंजऱ्यामधे जवळजवळ मध्यभागी थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला कललेले असते. मानवी हृदयाभोवती दुपदरी हृदयावरण असते. या हृदयावरणाच्या दोन थरांमध्ये एक द्रवपदार्थ असतो, त्यामुळे घर्षणापासून व धक्क्यांपासून हृदयाचे संरक्षण होते. मानवी हृदयाच्या आतील भागात एक उभा पडदा असतो त्यामुळे हृदयाचे डावे व उजवे असे दोन भाग पडतात. डाव्या व उजव्या भागांमधे असलेल्या आडव्या झडपींमुळे त्या प्रत्येकाचे दोन कप्पे असतात. अशा प्रकारे मानवी हृदयात चार कप्पे असतात.