Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Health of an ecosystem’ in Marathi
‘Health of an ecosystem’ चा मराठी अर्थ
शब्द: Health of an ecosystem
उच्चार: हेल्थ ऑफ ॲन इकॉसिस्टिम
अर्थ: परिसंस्थेचे आरोग्य
अधिक माहिती: Health of an ecosystem म्हणजे परिसंस्थेचे आरोग्य हे त्या परिसंस्थेच्या स्थितीचे निदर्शक रूपक आहे. आरोग्यपूर्ण परिसंस्थेमधे स्थानिक वनस्पती व प्राणी यांचे परस्परांशी व तेथील अजैविक घटकांशी संतुलित परस्परसंबंध असतात. संतुलित परिसंस्था ही त्यातील घटकांमधे झालेल्या बदलाना प्रतिरोध करते व बदल झाल्यास पुन्हा पुर्वीची संतुलित स्थिती पुन्हा प्राप्त करते. जैवविविधतेची जटिलता व घनता किती प्रमाणात आहे हे इकोसिस्टिमच्या आरोग्याचे एक प्रमाण मानले जाऊ शकते. वणवे, पूर, खाणकाम, प्रदूषण यांमुळे सजीवांचे व पर्यायाने परिसंस्थेचे आरोग्य धोक्यात येते.