Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Haploid’ in Marathi
‘Haploid’ चा मराठी अर्थ
शब्द: Haploid
उच्चार: हॅप्लॉइड
अर्थ: एकगुणी, एकपट, मूळ रंगसुत्रांचा एकच संच असणारी पेशी
अधिक माहिती: प्रत्येक सजीव प्रजातीच्या पेशींमधे ठरावीक मूळ रंगसुत्रांची (क्रोमोझोम्स) विशिष्ट संख्या असते. त्या संख्येला हॅप्लॉइड संख्या असे म्हणतात व तेवढेच रंगसुत्र असणार्या पेशीला हॅप्लॉइड पेशी असे म्हणतात. सहसा जननपेशी या हॅप्लॉइड असतात ज्यात त्या सजीवाच्या शरीरपेशीतील रंगसुत्रांच्या संख्येच्या अर्धी संख्या जननपेशीमधे असते.