Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Green house effect’ in Marathi
‘Green house effect’ चा मराठी अर्थ
शब्द: Green house effect
उच्चार: ग्रीन हाउस इफेक्ट
अर्थ: हरितगृह परिणाम
अधिक माहिती: वातावरणातील प्रदूषणकारक वायू सुर्याकडून येणारी उष्णता वातावरणामधे रोखून ठेवतात अशा वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात. उदा. कार्बन डायऑक्साइड (CO₂), नायट्रस ऑक्साइड, मिथेन व क्लोरोफ्लुरोकार्बन वायू (CFC) इ. हरितगृह वायूमुळे पृथ्वीच्या तापमानात वाढहोत आहे ज्याचे गंभिर दुष्परिणाम वातावरणातील बदलांच्या स्वरूपात दिसत आहेत. या परिणामांना Green house effect किंवा हरितगृह परिणाम असे म्हणतात. हरितगृह परिणामामुळे जागतिक तापमान वर्षानुवर्षे हळूहळू वाढत चालले आहे. यामुळे हवामानात बदल घडून येत आहेत. याच्या परिणामी कूथे अतिवृष्टी तर कुठे अवर्षण अशी स्थिती निर्माण होत आहे. पिकांचे उत्पादन, वन्यजीवांचे वितरण यांवर वाइट परिणाम दिसत आहे. तसेच हिमनग व हिमनद्या वितळून समुद्रपातळीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.