Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Genetic diversity’ in Marathi
‘Genetic diversity’ चा मराठी अर्थ
शब्द: Genetic diversity
उच्चार: जेनेटिक डायव्हर्सिटी
अर्थ: जनुकीय विविधता, सजीवसमूहामधे विशिष्ट गुणधर्मासाठी जनुकाचे विविध प्रकार असण्याची स्थिती
अधिक माहिती: Genetic diversity ही एका प्रजातीच्या सजीसमूहातील सजीवांमधे असणाऱ्या जनुकांतील विविधता निदर्शित करते. यामुळे सजीवांदरम्यान गुणवैशिष्ट्यांबाबत विविधता निर्माण होते. उदा. मनुष्यामधे त्वचेच्या रंगातील विविधता, केसांचे नैसर्गिक रंग (काळा, राखाडी, पिवळसर (ब्लोंड), लाल, इ.) व सरळ किंवा कुरुळे केस, डोळ्यांच्या पुतळीचा रंग, शरीराची उंची, ठेवण इ.