Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Gametophyte’ in Marathi
‘Gametophyte’ चा मराठी अर्थ
शब्द: Gametophyte
उच्चार: गॅमेटोफाइट
अर्थ: जननपेशी म्हणजेच युग्मक (गॅमेट) तयार करणारे वनस्पती शरीर
अधिक माहिती: Gametophyte हे गॅमेट्स (युग्मक/ जननपेशी) तयार करतात. गॅमेटोफाइट ही वनस्पतीच्या जीवनचक्रातील स्थिती आहे जी स्पोरोफाइट स्थितीनंतर आलटून पालटून येते. स्पोरोफाइट स्थितीचे कार्य स्पोर (बीजाणू, मेगास्पोर किंवा मायक्रोस्पोर) तयार करणे हे आहे. मेगास्पोर व मायक्रोस्पोर च्या मिऑसिस (अर्धसूत्री विभाजन) ने अनुक्रमे हॅप्लॉइड नर गॅमेटोफाइट व मादा गॅमेटोफाइट तयार होतात जे पुढे जननपेशी (गॅमेट) बनवतात. निम्न वनस्पतींमधे गॅमेटोफाइट हे हॅप्लॉइड (एकगुणी) स्थितितील मुख्य वनस्पती शरीर असते. दोन हॅप्लॉइड गॅमेट (नर आणि मादा) यांच्या एकत्रीकरणाने डिप्लॉइड स्पोरोफाइट तयार होते.