Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Follicle’ in Marathi
‘Follicle’ चा मराठी अर्थ
शब्द: Follicle
उच्चार: फॉलिकल
अर्थ: पुटीका
अधिक माहिती: स्त्रीच्या ओव्हरी (अंडाशय) मधे असंख्य फॉलिकल (पुटीका) असतात. प्रत्येक मासिक चक्रामधे त्यापैकी एका पुटीकेचा व त्यातील ऊसाइट (अंडपेशी/ डिंबपेशी) चा ‘पुटीका ग्रंथी संप्रेरक’ (Follicle stimulating hormone) च्या प्रभावामुळे विकास होण्यास सुरूवात होते. ही विकसनशील पुटिका ‘इस्ट्रोजेन’ हे संप्रेरक स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशय (युटेरस) च्या अंतःस्तराची (एन्डोमेट्रिअमची) पुनर्निमिती होते. ओव्हरी (अंडाशय) मधे वाढणाऱ्या फॉलिकल (पुटिका) ची वाढ पूर्ण झाल्यानंतर ‘पितपिंडकारी संप्रेरक’ (Luteinizing hormone) च्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका (फॉलिकल) फुटते व त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. याला ओव्ह्युलेशन (अंडमोचन) असे म्हणतात. अंडाशयामध्ये राहिलेल्या फुटलेल्या पुटिकेपासून पितपिंड (Corpus luteum) तयार होते.