Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Exosmosis’ in Marathi
‘Exosmosis’ चा मराठी अर्थ
शब्द: Exosmosis
उच्चार: एक्झॉस्मॉसिस
अर्थ: बहिःपरासरण
अधिक माहिती: अतिपरासरी (हायपरटोनिक) द्रावणात ठेवल्याने प्राणीपेशी किंवा वनस्पतीपेशीतील पाणी बाहेर पडते या प्रक्रियेला Exosmosis किंवा बहिःपरासरण असे म्हणतात. उदाहरणार्थ साखरेच्या घट्ट पाकात ताज्या फळांच्या फोडी टाकल्यास फोडींच्या पेशींतील पाणी बाहेर येऊन पाकात मिसळू लागते त्यामुळे फोडी थोड्या वेळाने आकसतात.