Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Endosperm’ in Marathi
‘Endosperm’ चा मराठी अर्थ
शब्द: Endosperm
उच्चार: एन्डोस्पर्म
अर्थ: भ्रूणपोष
अधिक माहिती: फुलातील डबल फर्टिलायझेशन (द्विफलन) दरम्यान एक पुंयुग्मक (मेल गॅमेट) हे दोन ध्रुवीय केंद्राकांशी संयोग पावून त्रिगुणी (ट्रिप्लॉइड) केंद्रक तयार होते. या ट्रिप्लॉइड केंद्रकाचे वारंवार विभाजन होऊन Endosperm किंवा भ्रूणपोष तयार होतो. एंडोस्पर्म/भ्रूणपोष हा बीजामधे असलेल्या गर्भाच्या अंकुरणानंतर वाढीसाठी अन्नपुरवठा करते.