Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Embryo sac’ in Marathi
‘Embryo sac’ चा मराठी अर्थ
शब्द: Embryo sac
उच्चार: एम्ब्रिओ सॅक
अर्थ: भ्रूणकोष
अधिक माहिती: फुलातील ओव्ह्युल (बीजांड) मध्ये अर्ध गुणसूत्री (मिऑसिअ) विभाजनाने Embryo sac किंवा भ्रूणकोष तयार होतो. भ्रूणकोशामध्ये एक एकगुणी /अर्ध सूत्री (हॅप्लॉइड) अंडपेशी (स्त्रीबीज/ एग सेल), दोन एकगुणी (हॅप्लॉइड) ध्रुवीय केंद्रके (पोलार न्युक्लिआइ) असतात, दोन हॅप्लॉइड सिनर्जीड (सहायक) पेशी आणि तीन हॅप्लॉइड ॲंटिपोडल पेशी असतात.