Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘ELISA test’ in Marathi
‘ELISA test’ चा मराठी अर्थ
शब्द: ELISA test
उच्चार: एलायझा टेस्ट
अर्थ: एलायझा चाचणी
अधिक माहिती: प्रामुख्याने एड्सचे निदान करण्यासाठी (रुग्णाला एचआयव्ही संसर्ग आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी) व रोगनिदानासाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत केली जाणारी चाचणी. ELISA चाचणीत विशिष्ट प्रतिपिंडे व त्यांना जोडलेल्या वितंचकांचा वापर केला जातो. ELISA हे Enzyme Linked Immunosorbent Assay याचे संक्षिप्त लघुरूप आहे.