ॲप डाउनलोड करा

Download Sciencekosh App

अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)

बॅच जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा.

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्याची 75 वर्षे 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

Marathi Science Dictionary

Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
Search in posts
Search in pages

मराठी विज्ञान शब्दकोश

Meaning of ‘Electronic configuration of elements’ in Marathi

‘Electronic configuration of elements’ चा मराठी अर्थ

शब्द: Electronic configuration of elements

उच्चार: इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स

अर्थ: मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण

अधिक माहिती: एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण होय. कवचांच्या कमालधारकतेनुसार अणूमधील इलेक्ट्रॉनांचे कवचांमध्ये वितरण होते. K, L, M, N …. या कवचांमध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त, 2, 8, 18, 32…. इलेक्ट्रॉन सामावले जाऊ शकतात. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण स्वल्पविरामांनी विलग केलेल्या अंकांनी दर्शवितात. इलेक्ट्रॉन संरूपणातील अंक ऊर्जेच्या चढत्या क्रमाने असलेल्या कवचांमधील इलेक्ट्रॉन संख्या दर्शवितात. उदाहरणार्थ, क्लोरिनचे कवचानु्सार इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,7 आहे. याचा अर्थ सोडिअम अणूमध्ये पहिल्या ‘K’ कवचात 2, दुसर्या ‘L’ कवचात 8 व तिसर्या ‘M’ कवचात उरलेले 7 याप्रमाणे एकूण 17 इलेक्ट्रॉन विविध कवचांमधे वितरित केलेले असतात. (क्लोरिनचा अणुंक 17 आहे म्हणजे त्याच्या अणुमधे 17 इलेक्ट्रॉन असतात). याच प्रत्येक K, L, M, N कवचातील इलेक्ट्रॉन त्या कवचातील उपकवचामधे उपकवचांच्या जास्तीत जास्त क्षमतेप्रमाणे वितरित केलेले असतात. कवचांमधे s, p, d, f हे उपकवच असतात. s उपकवचामधे जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन, p उपकवचामधे 6, d उपकवचामधे 10 व f उपकवचामधे जास्तीत जास्त 14 इलेक्ट्रॉन सामावले जाऊ शकतात. उपकवचांतील मांडणीनुसार क्लोरिनचे इलेक्ट्रॉनिक संरूपण 1s², 2s², 2p⁶, 3s², 3p⁵ याप्रकारे असू शकते. म्हणजे पहिले कवच K मधे 2 इलेक्ट्रॉन (1s²), दुसरे कवच L मधे 8 इलेक्ट्रॉन (2s², 2p⁶), तिसरे कवच M मधे 7 इलेक्ट्रॉन (3s², 3p⁵) याप्रकारे उपकवचांमधील इलेक्ट्रॉनची मांडणी दर्शविली जाते. मूलद्रव्याची संयुजा, संयुगांमधील रासायनिक बंध यांच्यासंबंधी संकल्पना इलेक्ट्रॉन संरूपणामुळे स्पष्ट होतात.

तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा

टेलीग्राम चॅनेलसाठी इथे किंवा चॅनेलचे नाव किंवा चॅनेल आयकॉन वर क्लिक करा

Poll about which class currently studying
11th Admission CET Test Series Sciencet Series Science
अकरावी / बारावी MHT-CET (Biology) चा अभ्यास मराठीतून
ॲप डाउनलोड करा
Download Sciencekosh App
वाचा माहितीपूर्ण विज्ञान लेख …
perseverance and ingenuity on marse surface
Sciencekosh banner
error: