Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Electron’ in Marathi
‘Electron’ चा मराठी अर्थ
शब्द: Electron
उच्चार: इलेक्ट्रॉन
अर्थ: अणूच्या आत असलेला ॠणप्रभारित कण
अधिक माहिती: इलेक्ट्रॉनचा शोध जे. जे. थॉमसन ह्या वैज्ञानिकाने लावला. इलेक्ट्रॉन हा केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारा ॠणप्रभारित अवअणुकण आहे. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असते. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य मानता येते. इलेक्ट्रॉनचा निर्देश ‘e – ’ ह्या संज्ञेने करतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ॠणप्रभार (-1e) असतो. अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती वेगवेगळ्या कक्षा किंवा कवचांमध्ये परिभ्रमण करतात. अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्या केंद्रकामधील प्रोटॉनसंख्येइतकी म्हणजेच अणुअंकाइतकीच (Z= अणुअंक) असते.