Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Dry cell’ in Marathi
‘Dry cell’ चा मराठी अर्थ
शब्द: Dry cell
उच्चार: ड्राय सेल
अर्थ: कोरडा विद्युतघट, कोरड्या स्थितितील विद्युतरासायनिक अभिक्रियेद्वारे विद्युतप्रवाह निर्माण करण्यासाठीचे साधन
अधिक माहिती: कोरड्या विद्युतघटामधे घन स्थितितील विद्युत अपघटनी म्हणजे विद्युतरसायनं वापरलेली असतात. विद्युतरसायनांदरम्यान रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो. कोरडे विद्युतघट हे ओल्या विद्युतघटांच्या तुलनेत वापरण्यासठी सहज-सोपे व सुरक्षित असतात. ते कुठल्याही स्थितीत (उभे आडवे) वापरले जाऊ शकतात व त्यांतून रसायनं सांडण्याची शक्यता नसते. कोरडे विद्युतघट हे रेडिओ संच, घड्याळ, विजेरी इ. मध्ये वापरली जातात. कोरडा विद्युतघटाच्या सर्वात बाहेरचे आवरण हे जस्त (Zn) धातूचे असते जे घटाचे ॠण टोक असते. जस्ताच्या आवरणाच्या आत ZnCl₂ (झिंक क्लोराईड) आणि NH₄Cl (अमोनिअम क्लोराईड) यांचे ओले मिश्रण हे विद्युत अपघटनी म्हणजेच Electrolyte भरलेले असते. विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित व ॠणप्रभारित आयन असतात. त्यांच्यामार्फत विद्युतवहन होते. घटाच्या मध्यभागी एक ग्राफाइट कांडी (कार्बनची कांडी) असते जीच्या बाहेरील भागात MnO₂ (मँगनीज डायॉक्साइड) ची पेस्ट भरलेली असते. ग्राफाइट कांडी ही घटाचे धन टोक असते. रासायनिक पदार्थांच्या विद्युतरासायनिक अभिक्रियेमुळे ग्राफाइट कांडी (धन टोक) व जस्ताचे आवरण (ॠण टोक) यांच्यादरम्यान विद्युतप्रभार तयार होतो व दोन टोक परिपथाला जोडल्यास परिपथातून विद्युतप्रवाह वाहतो.